18,000 रुपयांमध्ये घरावर सौर प्यानल लावा आणि मोफत वीज वापर

वाढत्या वीज बिलांमुळे तुमच्यावर आर्थिक ताण येत असेल तर याचा एक चांगला पर्याय म्हणजे सोलर पॅनेल बसवणे. केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्य घर योजना तुम्हाला त्यासाठी मदत करेल. ही योजना तुम्हाला दरमहा 300 युनिट मोफत वीज देईल आणि सोलर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडीही मिळेल.

पंतप्रधान सूर्य घर योजनेचे उद्दिष्ट एक कोटी कुटुंबांना सौर ऊर्जा मोफत पुरवणे आहे. ही योजना 1 किलोवॅट ते 10 किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनेलसाठी लागू होते. 1 किलोवॅट सोलर पॅनेलमधून दररोज 4.32 किलोवॅट वीज तयार होईल. वर्षभरात ते जवळजवळ 1,577 किलोवॅटतास वीज निर्माण करेल. त्यामुळे तुम्ही वार्षिक सुमारे 5,000 रुपये वाचवू शकता.

सरकारी सबसिडीमुळे सोलर पॅनेल बसवणे सध्या अधिक परवडणारे झाले आहे. केंद्र सरकार एकूण खर्चाच्या 40% ते 60% खर्च भागवते. उदाहरणार्थ, 1 किलोवॅटचा ऑन-ग्रिड सोलर सिस्टीम 40,000 ते 50,000 रुपयांत येऊ शकतो. सबसिडीनंतर तुम्हाला फक्त 24,000 ते 30,000 रुपये मोजावे लागतील.

सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला pmsuryaghar.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तिथे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. ऑफलाइन नोंदणी करायची असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता. नोंदणी केल्यानंतर, नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या. त्यानंतर प्लांटचे डिटेल्स सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

वीज वितरण कंपनीकडून नेट मीटरचे इंस्टॉलेशन झाल्यानंतर, तुम्हाला पोर्टलवरून कमिशनिंग सर्टिफिकेट मिळेल. यानंतर बँक खात्याचे डिटेल्स आणि कॅन्सल केलेला चेक अपलोड करा. 30 दिवसांत सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

सरकारच्या या योजनेमुळे सोलर पॅनेल बसवणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे तुम्ही वीज बिलावर होणारा खर्च कमी करू शकता आणि पर्यावरणाची देखील काळजी घेऊ शकता. एकदा लगेच सोलर पॅनेल बसवा आणि मोफत वीजेचा आनंद घ्या!

Leave a Comment