Mansoon Update : मान्सून येताच केरळचा मौसम बदलला. पाणवारे वाहू लागले आणि समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने वाहत असून, गुरुवारी दुपारी केरळमध्ये आल्यावर ते जलदगतीने पुढे सरकले. मान्सून तळकोकण (सिंधुदुर्ग) आणि गोव्यात ३ जूनला येत आहे, तर मुंबई आणि पुण्यात ५ किंवा ६ जूनला येण्याची शक्यता आहे.
गॅस सिलिंडर धारकांसाठी खूशखबर! 1 जून पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार घसरण
मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात गुरुवारी दुपारी एकाच दिवशी दाखल झाला. केरळात मान्सून ३० मे रोजीच दाखल झाल्यामुळे तळकोकणात ३ जूनपर्यंत, तर मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात ५ ते ६ जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज खरा ठरला आहे. ‘अल निनो’ची स्थिती संपून ‘ला निना’ सक्रिय झाल्यामुळे १९ मे रोजी मान्सूनचे वारे अंदमानात पोहोचले. त्यानंतर २४ मे रोजी आलेल्या ‘रेमल’ चक्रीवादळाने मान्सूनला गती दिली. मान्सून दरवर्षी केरळमध्ये १ जूनला येतो, तर ईशान्य भारतात त्यानंतर येतो. चार-पाच दिवसांच्या अंतराने दाखल होतो.
बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत 523 जागांसाठी भरती
मात्र, यंदा तो केरळमध्ये नियोजित तारखेपेक्षा दोन दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी, तर ईशान्य भारतातही त्याच दिवशी दाखल झाल्याने तो संपूर्ण देशात वेगाने प्रवास करेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.
मान्सून अरबी समुद्रातून केरळमध्ये आणि बंगालच्या उपसागरातून समुद्राच्या पूर्व शाखेने ईशान्य भारतात गुरुवारी दाखल झाला. अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य, आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप क्षेत्र, केरळचा बहुतांश भाग, माहे, दक्षिण तामिळनाडूचा काही भाग, उर्वरित मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राच्या काही भागांत पोहोचला आहे. तसेच संपूर्ण ईशान्य भारतातील बहुतांश भाग नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा बहुतांश भाग व्यापला आहे.
India payment bank मधून मिळवा 15 लाख रुपये कर्ज, अशी करा प्रोसेस
केरळात मान्सून दाखलहोताच महाराष्ट्रात वाऱ्यांचावेग वाढला आहे. बहुतांश भागांत ढगाळ वातावरणामुळे उष्मा जाणवत असून, ३१ मे ते ५ जून याकालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्याते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.