आनंदाची बातमी ! राज्यात मान्सून येत्या 48 ते 72 तासात दाखल होणार

केरळमध्ये थांबलेला मान्सून रविवारी कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पोहोचला. पश्चिमी वारे वेगाने वाहू लागल्यामुळे, तो लवकरच तळकोकण, पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पुढील ४८ ते ७२ तासांत पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आनंदाची बातमी ! राज्यात मान्सून येत्या 48 ते 72 तासात दाखल होणार

केरळमध्ये मान्सून यंदा ३० मे रोजीच दाखल झाला. पण ४८ तास तो तिथेच थांबला होता. रविवारी त्याने गती घेतली आणि कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही भाग व्यापले. तसेच अरबी समुद्रासह ईशान्य भारतात त्याची प्रगती सुरू आहे. उत्तर भारतात अजून दोन ते तीन दिवस उष्णता राहील, त्यानंतर बिहारमध्ये मान्सून पोहोचताच उष्णतेची लाट कमी होईल.

आनंदाची बातमी ! राज्यात मान्सून येत्या 48 ते 72 तासात दाखल होणार

राज्यातील हवामान तज्ज्ञांच्या मते, रविवारी पश्चिमी वारे वेगाने वाहू लागले. त्यामुळे तीन राज्ये एका दिवसात मान्सूनच्या कवेत आली. त्यामुळे महाराष्ट्रात तो पुढील ४८ ते ७२ तासांत पोहोचू शकतो.

आजपासून राज्यात पावसाची शक्यता

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सोमवार ३ जूनपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस ५ जूनपर्यंत सुरू राहील.

पश्चिमी वारे रविवारपासून वेगाने वाहू लागल्यामुळे मान्सून आता महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत तो तळकोकणासह राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवार, ३ जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर मान्सूनही येईल अशी माहिती माजी हवामान विभाग प्रमुख, पुणे, डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

Leave a Comment