राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाते. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ दिली जाते. त्यामुळे पुढील महिन्यात त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. वार्षिक वेतनवाढ लागू करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत:- एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या 1 जुलैपासून चालू वर्षाच्या 30 जूनपर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या 1 जुलैपासून वार्षिक वेतनवाढ मिळेल.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियमांनुसार, परिविक्षाधीन म्हणून थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पहिली वेतनवाढ 1 वर्षाचा परिविक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच दिली जाईल, अशी तरतूद आहे.
वार्षिक वेतनवाढ किती असते?
सहाव्या वेतन आयोगानुसार, मूळ वेतनाच्या 3 टक्के रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जाते. सातव्या वेतन आयोगानुसारही 3 टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र, मूळ वेतनाच्या 3 टक्के रक्कम पुढील शतकांमध्ये रुपांतरीत करून वार्षिक वेतनवाढ गणली जाते.
सातव्या वेतन आयोगानुसार, आपले सध्याचे मूळ वेतन आणि पुढील वेतनवाढ वेतन स्तरानुसार पाहू शकता. यासाठी आपला वेतनस्तर (पे-मॅट्रिक्स) माहित असणे अत्यावश्यक आहे.