मोठी बातमी : या राज्य कर्मचाऱ्यांच्या 15 नोव्हेंबर पासून सर्व रजा बंद !

मोठी बातमी : या राज्य कर्मचाऱ्यांच्या 15 नोव्हेंबर पासून सर्व रजा बंद !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतदान प्रक्रिया दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे तरी या कामी जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सर्व प्रकारच्या रजा आता 15 नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे संबंधित खात्याकडून असा आदेश देखील काढण्यात आला आहे.

विषय :- साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकरच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्याबाबत.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने राज्यामध्ये दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान होणार आहे व दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

२. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी दिनांक १५/११/२०२४ ते दिनांक २५/११/२०२४ या कालावधीत सर्व अधिकारी व

अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यात येत आहेत.

३. तरी, घटक प्रमुख यांना विनंती करण्यात येते की, यांनी सदर कालावधीत वैद्यकीय कारण सोडून इतर कोणत्याही कारणास्तव शक्यतो रजा देऊ नये.

Leave a Comment