मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जाते.
योजनेची मुख्य माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | महिला व बाल विकास विभाग |
| लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
| आर्थिक मदत | ₹1500 प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
| अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन क्रमांक | 181 |
योजनेची उद्दिष्टे
- आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून सक्षम बनवणे.
- महिलांना त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी मदत करणे.
- महिला सबलीकरणाला चालना देणे.
पात्रता निकष
| क्र. | निकष |
|---|---|
| 1. | अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. |
| 2. | अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे. |
| 3. | कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन नसावे. |
| 4. | अर्जदार महिला शासनाच्या इतर आर्थिक योजनांची लाभार्थी नसावी. |
| 5. | अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. |
| 6. | अर्जदार महिलांच्या नावावर स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. |
आवश्यक कागदपत्रे
| क्र. | कागदपत्रे |
|---|---|
| 1. | आधार कार्ड |
| 2. | बँक पासबुक |
| 3. | उत्पन्न प्रमाणपत्र |
| 4. | शाळा सोडल्याचा दाखला |
| 5. | राशन कार्ड |
| 6. | हमीपत्र |
| 7. | पासपोर्ट साइज फोटो |
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सुरुवातीला, महिलांनी नारी शक्ती अॅप किंवा सेतू केंद्र यांच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
- परंतु तांत्रिक अडचणीमुळे सरकारने ही प्रक्रिया बंद केली आणि ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट सुरू केली.
- नवीन अर्ज प्रक्रिया सध्या बंद आहे.
- ऑक्टोबर 2024 मध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
- वेबसाईट: ladakibahin.maharashtra.gov.in
- हेल्पलाइन क्रमांक: 181
सरकारने या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2024 पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सहा महिन्यांचे अनुदान जमा केले आहे. या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे, आणि त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
नवीन अर्ज प्रक्रियेविषयी अधिकृत घोषणेसाठी वेबसाईट नियमित तपासा.