30 एप्रिल पर्यंत हे 2 पुरावे द्या नाहीतर तुमचे रेशन कार्ड रद्द होणार

शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अपात्र शिधापत्रिका शोधून काढण्यात येणार आहेत. तलाठी व स्वस्त धान्य दुकान चालकांच्या सहकार्याने ही तपासणी पार पडणार आहे.

Table of Contents

हा पुरावा द्यावा लागणार

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या अंत्योदय, प्राधान्य व धवल श्रेणीतील शिधापत्रिकांची तपासणी केली जाईल. शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तसेच त्यांचा रहिवासी पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे शिधापत्रिका धारक अपात्र ठरणार

पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यास संबंधितांची शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. तसेच, तपासणी दरम्यान शासकीय, निमशासकीय किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी, तसेच एक लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेले व्यक्ती पिवळ्या अथवा केशरी शिधापत्रिकेच्या श्रेणीत आढळल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल. त्यानंतर त्यांच्या उत्पन्नानुसार योग्य श्रेणीतील नवीन शिधापत्रिका देण्यात येईल.

Leave a Comment