DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांचा एरियर, कॅबिनेटची मंजुरी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर – महागाई भत्ता वाढला, 3 महिन्यांचा एरियर, कॅबिनेटची मंजुरी, मे महिन्यात वाढीव पगार खात्यात

महागाई भत्त्यात झालेल्या वाढीचा फायदा राज्य सरकार, पंचायत सेवा आणि इतर विभागांमधील एकूण 4.78 लाख कर्मचारी तसेच सुमारे 4.81 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महागाई भत्त्यात 2% वाढ

गुजरात राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% ने वाढवण्यात आला आहे, तर सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भत्ता 6% ने वाढवण्यात आला आहे. याचा लाभ एकूण 9.59 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पण महागाई भत्त्यात आताच २ टक्के वाढ करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील २ टक्के महागाई भत्ता वाढ होऊ शकते.

जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीचा एरियर मिळणार

1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या फरकाचा एरियर एप्रिल 2025 च्या पगारासोबत एकाच हप्त्यात दिला जाईल. गुजरात राज्य सरकारने यासाठी 235 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक वेतन खर्च आणि एकूण 946 कोटी रुपये वेतन-भत्ते व पेन्शन यासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment