राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ऑक्टोबर महिन्याचे वेतन या दिवशी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ऑक्टोबर महिन्याचे वेतन या दिवशी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन देयके प्रलंबित; वित्त विभागाकडून नवीन निर्देश

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर (पेड इन ऑक्टोबर 2025) चे वेतन अद्याप वितरित झालेले नव्हते. या संदर्भात वित्त विभागामार्फत सर्व संबंधित कार्यालयांना ई-मेलद्वारे वेतनाची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याचे आदेश

वित्त विभागाच्या दिनांक 06 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, सेवार्थ प्रणालीमध्ये मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या अनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) तसेच प्रशासकीय विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही पूर्ण न केल्यास त्यांच्या कार्यालयांचे माहे सप्टेंबर 2025 चे वेतन देयके कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयांमार्फत स्वीकारण्यात येणार नाहीत, अशी अट परिपत्रकात नमूद करण्यात आली होती.

सेवार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे विलंब

मात्र, प्रत्यक्षात सेवार्थ प्रणालीमध्ये मंजूर पदांचा ताळमेळ घेताना अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे विविध विभागांकडून कळविण्यात आले आहे. या अडचणींमुळे सप्टेंबर महिन्याचे (पेड इन ऑक्टोबर) मासिक वेतन देयके तयार करण्यास आणि सादर करण्यास विलंब झाला आहे.

दिनांक 06 ऑक्टोबर 2025 पर्यंतही अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन देयके तयार किंवा सादर न झाल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

वित्त विभागाकडून नवी कार्यवाही सुरू

या पार्श्वभूमीवर मा. प्रधान सचिव (वित्त विभाग) तसेच मा. संचालक (लेखा व कोषागार) यांच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाची प्रक्रिया तातडीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, माहे सप्टेंबर (पेड इन ऑक्टोबर 2025) चे सर्व वेतन देयके कोषागार / उपकोषागार कार्यालयांमार्फत स्वीकारून पारित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाचा मार्ग मोकळा

वित्त विभागाच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होणार असल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment