किंग कोब्रा आणि वाघ समोरासमोर कोण ठरले सरस, एकदा व्हिडिओ पहाच, cobra and tiger viral video
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हटले की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे वाघ. या जंगलावर जणू वाघांचीच मक्तेदारी आहे असे वाटते. इतर प्राणी, विशेषत: सरपटणारे प्राणी, येथे फारसे कुणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र, नागपंचमीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका प्रसंगाने ही समजूत चुकीची असल्याचे दाखवून दिले. तब्बल २५ मिनिटे एका कोब्राने वाघाला जागच्या जागी थांबवून ठेवले आणि त्याला हलूही दिले नाही. हा थरारक क्षण पर्यटकांनी प्रत्यक्ष पाहिला.
Viral video पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोब्रा विरुद्ध वाघ – २५ मिनिटांची नजरानजर
ताडोबाच्या बेलारा बफर क्षेत्रात हा प्रसंग घडला. वीरा या वाघिणीचा बछडा असलेला ‘कालू’ नावाचा वाघ पाण्याच्या झऱ्याजवळ निवांत पहुडलेला होता. तेवढ्यात अचानक एक कोब्रा त्या ठिकाणी आला. सुरुवातीला कालू वाघाला याची कल्पनाही नव्हती. मात्र, कोब्रा फणा काढून त्याच्यासमोर उभा राहिला तेव्हा वाघ सावध झाला. पुढील २५ मिनिटे कोब्रा आणि वाघामध्ये थरारक नजरानजर सुरू होती.
पर्यटकांचा श्वास रोखून धरलेला क्षण
साधारणपणे वाघ समोरच्या प्राण्याला पाहिला की त्याच्यावर झडप घालतो. पण यावेळी काही वेगळेच चित्र दिसले. वाघानेही कोब्राला शिकार केले नाही आणि कोब्रानेही वाघावर हल्ला चढवला नाही. एक क्षण असा आला की कोब्रा वाघाला दंश करेल असे वाटले, तर दुसऱ्या क्षणी वाघ कोब्राला संपवेल असे भासत होते. त्यामुळे हा सगळा प्रसंग पाहताना पर्यटकांनी अक्षरशः श्वास रोखून धरला होता.
युद्धापूर्वीची शांतता – आणि ‘फ्लॉप शो’
पर्यटकांना असे वाटत होते की कधीही एक मोठा संघर्ष सुरू होईल. “आता काहीतरी घडणार” अशी सगळ्यांचीच मानसिक तयारी झाली होती. पण अखेर तो क्षण कधीच आला नाही. २५ मिनिटे एकमेकांकडे पाहिल्यानंतर हा सामना रंगला नाही आणि पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. युद्धापूर्वीची शांतता म्हणतात ती याठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
ताडोबातील वेगळी कहाणी
आजवर ताडोबामध्ये वाघांच्या शिकारीचे थरार अनेकदा पाहायला मिळाले. पण कदाचित पहिल्यांदाच वाघ आणि कोब्रा यांच्यात असा थरार रंगता रंगता राहिला. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे ताडोबात केवळ वाघच नाहीत, तर इतर प्राण्यांची देखील स्वतंत्र मक्तेदारी आहे हे अधोरेखित झाले. या थरारक घटनेचे छायाचित्रण वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकार नितीन घाटे यांनी केले.