सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ संदर्भात शासन निर्णय GR निर्गमित

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 20/10/2025 रोजी महागाई भत्ता वाढी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सविस्तर शासन निर्णय पुढे पाहू शकता

भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग यांच्या दिनांक 06 ऑक्टोबर 2025 च्या क्र. 1/4(i)/2025-E.II(B) या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र शासनाकडे प्राप्त झाली असून, सदर ज्ञापनातील तरतुदींविषयी आवश्यक माहिती आणि योग्य ती कार्यवाही करण्यासाठी हे ज्ञापन राज्यातील संबंधित विभागांना अग्रेषित करण्यात येत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ संदर्भात शासन निर्णय GR निर्गमित

केंद्र शासनाच्या उपरोक्त कार्यालयीन ज्ञापनानुसार, दिनांक 01 जुलै 2025 पासून केंद्र शासनातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मंजूर करण्यात आलेली आहे. त्याअनुसार, पूर्वीचा 55% दरातील महागाई भत्ता आता 58% दराने लागू करण्यात आला आहे.

वरीलप्रमाणे वाढ करण्यात आलेला 58% दराने महागाई भत्ता हा महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी (IAS, IPS आणि IFS) यांनाही लागू राहील. या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणेच दिनांक 01/07/2025 पासून सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात येईल.

सदर शासन निर्णय व संबंधित पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर
👉 www.maharashtra.gov.in
या ठिकाणी उपलब्ध आहे. या पृष्ठांकनाचा संकेतांक क्रमांक 202510201615125207 असा असून, तो डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आलेला आहे.

वरील निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. संबंधित सर्व विभागांनी व कार्यालयांनी या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 01 जुलै 2025 पासून सुनिश्चित करावी.

Leave a Comment