महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ, शासन निर्णय

केंद्र सरकारच्या धर्तीवर अखेर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55% वरून वाढून 58% इतका झाला आहे.

[राज्य शासनाचा अधिकृत GR पाहा – Click Here]

केंद्र सरकारचा निर्णय आणि राज्य सरकारची अंमलबजावणी

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिनांक 1 जुलै 2025 पासून 3 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आधार घेत, महाराष्ट्र शासनानेदेखील राज्यातील सर्व विभागांसाठी हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयाचे तपशील

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन स्वतंत्र शासन निर्णय (Government Resolution) जारी करण्यात आले आहेत. या निर्णयांनुसार, केंद्र सरकारच्या कार्मिक, लोक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, तसेच निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या दिनांक 06 ऑक्टोबर 2025 च्या कार्यालयीन ज्ञापनाचा राज्य शासनाने संदर्भ घेतला आहे.

या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनाही केंद्र सरकारप्रमाणेच वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

वाढीव महागाई भत्त्याचा लाभ

शासन निर्णयानुसार, 1 जुलै 2025 पासून वाढीव 3% महागाई भत्ता लागू करण्यात आला असून, आता एकूण महागाई भत्ता 58% दराने अनुज्ञेय राहील. हा लाभ राज्य शासनातील सर्व पात्र कर्मचारी तसेच राज्यातील निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहणार आहे.

शासन निर्णय डाउनलोड लिंक

राज्य शासनाने जारी केलेले दोन्ही अधिकृत शासन निर्णय (GR) राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सविस्तर GR पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा

ह्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.

Leave a Comment