WCD Recruitment 2025: महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती

WCD Recruitment 2025: महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत विविध गट-ब (राजपत्रित) पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती फक्त संबंधित विभागातील पात्र आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित असून विभागीय स्पर्धा परीक्षा पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ wcd.nic.in ला भेट देऊ शकतात.

भरतीतील पदे

या भरतीमध्ये खालील गट-ब (राजपत्रित) पदांचा समावेश आहे—
अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण).

वेतन श्रेणी

उक्त पदांसाठी वेतन मॅट्रिक्स लेव्हल 9 ते 15 (₹41,800 ते ₹1,32,300) प्रमाणे ठेवण्यात आले असून, यासोबत महागाई भत्ता आणि शासन नियमांनुसार मिळणारे इतर भत्ते लागू असतील. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात करण्यात येऊ शकते.

निवड आणि परीक्षा प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या एकत्रित निकालावर आधारित केली जाईल.

  • लेखी परीक्षा: 400 गुण
  • मुलाखत: 50 गुण
    अंतिम गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रम यादी तयार करण्यात येईल.

लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी 25% नकारात्मक गुण कपात लागू राहील. परीक्षा केंद्र फक्त नवी मुंबई येथे असेल.

परीक्षेची सविस्तर रूपरेषा

पेपर 1 — सामान्य ज्ञान, शासन नियम, कायदे, योजना, विभागीय कार्यपद्धती (200 गुण)
पेपर 2 — संबंधित पदासाठी आवश्यक व्यावसायिक/प्रशासकीय ज्ञान (200 गुण)
मुलाखत — 50 गुण

निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी संबंधित विभागामार्फत केली जाईल.

शैक्षणिक व सेवा पात्रता

  • महिला व बाल विकास विभाग किंवा ग्रामविकास विभागातील संबंधित संवर्गातील कर्मचारीच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने 1 जानेवारीपर्यंत आपल्या कार्यरत पदावर सलग 7 वर्षे नियमित सेवा केलेली असणे बंधनकारक.
  • संगणकाचे प्रमाणपत्र तसेच मराठी आणि हिंदी भाषा परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक.

अर्ज शुल्क

  • सामान्य प्रवर्ग: ₹719
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹449
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या नियमांनुसार शुल्क सवलत लागू

महत्वाची टीप

परीक्षा, निवड प्रक्रिया आणि शिफारशीसंबंधी सर्व नियम शासन निर्णय व आयोगाच्या कार्यनियमावलीनुसार लागू राहतील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर सूचना आणि अद्ययावत माहिती सतत तपासणे आवश्यक आहे.

Leave a Comment