राज्यातील या शेतकऱ्यांना 831 कोटींचं अनुदान; हेक्टरी इतके रुपये मिळणार

राज्यातील या शेतकऱ्यांना 831 कोटींचं अनुदान; हेक्टरी इतके रुपये मिळणार

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी 2006 ते 2013 दरम्यान शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली होती. आता या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून एकूण 831 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

अनुदानाचे वितरण व प्रमाण

शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी सरासरी 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पश्चिम विदर्भातील 14,149 हेक्टर जमीन दिलेल्या बाधितांना 700 कोटी रुपये दिले जाणार असून, पूर्व विदर्भातील 2,484.20 हेक्टर साठी 124 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय भूसंपादन व अनुदानाची माहिती

  1. अमरावती – 7,291.48 हेक्टर जमीन, 474.05 कोटी रुपये खर्च, 6.50 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान
  2. अकोला – 1,000 हेक्टर जमीन, 67.10 कोटी रुपये खर्च, 6.70 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान
  3. वाशिम – 2,580.71 हेक्टर जमीन, 160.02 कोटी रुपये खर्च, 6.20 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान
  4. बुलढाणा – 1,312.25 हेक्टर जमीन, 252.16 कोटी रुपये खर्च, 19.21 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान
  5. यवतमाळ – 1,964.46 हेक्टर जमीन, 134.43 कोटी रुपये खर्च, 6.84 लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान

मुख्यमंत्री फडणवीसांचा अमरावती दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर असून, अमरावती विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये एशियातील पहिले पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावती विमानतळावर स्थापन करण्याची घोषणा, शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 1,600 कोटी रुपयांची मंजुरी, नांदगाव पेठ MIDC येथे टेक्स्टाईल पार्क, ग्रामीण पोलिस वसाहतीचं लोकार्पण, तसेच CRF निधी अंतर्गत 175 कोटी रुपयांची मंजुरी यांचा समावेश आहे.

Leave a Comment