बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत भांडी संच मिळणार
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल व बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला मोफत भांडी संच वितरित करण्यात येणार असून, 2 डिसेंबरपासून ही योजना लागू होणार आहे.
बांधकाम कामगार भांडी योजना अपडेट
महाराष्ट्र सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते, ज्यात बांधकाम कामगार भांडी योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देते. कामगारांना यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक आहे, जी फक्त 1 रुपयात केली जाते.
बांधकाम कामगार योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
भांडी संच वितरण कधीपासून?
सूत्रांच्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 2 डिसेंबरपासून बांधकाम कामगारांना भांडी संच वितरणाची प्रक्रिया सुरू होईल.
कोणाला लाभ मिळणार?
ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी करून अर्ज केला आहे व अर्ज पात्र ठरले आहेत, त्यांना मोफत भांडी संच वितरण होईल. जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसल्यास, लवकरात लवकर नोंदणी करून योजनेचा लाभ मिळवावा.
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जा.
- “Construction Worker: Registration” वर क्लिक करा.
- आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाकून “Proceed to Form” वर क्लिक करा.
- 1 रुपयाचा शुल्क भरून अर्ज सक्रिय करा.
बांधकाम कामगार योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मोफत भांडी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
मोफत भांडी योजनेसाठी अर्ज ऑफलाईन करावा लागतो. अर्ज केल्यानंतर कामगारांना त्यांच्या मोबाइलवर संदेश येतो. जर एकापेक्षा जास्त कामगारांनी अर्ज केला असेल, तर त्यांना संबंधित ठिकाणी बोलावून आधार बायोमेट्रिक प्रक्रिया केली जाते. अर्ज पात्र ठरल्यास मोफत भांडी संच मिळतो.