Crop Insurance : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रमुख पिकांसाठी विमा संरक्षण आणि विमा प्रीमियम कृषी विभागाने घोषित केले आहेत. शेतकऱ्यांना केवळ एका रुपयात पीकविमा मिळू शकतो.
भातासाठी प्रति हेक्टरी ५१,७६० रुपये आणि सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी ४९,००० रुपये विमा संरक्षण निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या खरीप हंगामात फक्त १ रुपया भरून पीकविम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान पीकविमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या कालावधीसाठी ‘सर्वसमावेशक पीकविमा योजना’ (कप ॲण्ड कॅप मॉडेल ८०:११०) आहे.
राज्य शासनाने २६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरवणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवणे, नावीन्यपूर्ण आणि सुधारित तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे, कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखणे, अन्नसुरक्षा टिकवणे आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
पीकविमा योजनेच्या अधिक माहितीसाठी
योजनेविषयी अधिक माहितीसाठी विमा कंपनी एच.डी.एफ.सी. इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई टोल फ्री क्रमांक १४४४७, ई-मेल आयडी pmfby.maharashtra@hdfcergo.com येथे संपर्क साधावा.
तसेच, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, निकटवर्तीय विविध कार्यकारी सोसायट्या, सीएससी सेंटर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय स्तरावरील संबंधित कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.
पुणे जिल्ह्यासाठी या योजनेत समाविष्ट पिके, तालुके, विमा संरक्षणाची रक्कम आणि विमा हप्ता दर.
पीक | तालुके | विमा (प्रतिहेक्टरी) | विमा रक्कम |
भात | हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर- | 51,760 रुपये | 1552.80 रुपये |
बाजरी | हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर | 24,000 रुपये | 2,640 रुपये |
ज्वारी | हवेली, भोर, खेड, आंबेगाव | 27,000 रुपये | 4,860 रुपये |
बाजरी | हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर | 24,000 रुपये | 2,640 रुपये |
नाचणी | मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव | 20,000 रुपये | 800 रुपये |
तूर | शिरूर, बारामती, इंदापूर | 35,000 रुपये | 7,350 रुपये |
मूग | शिरूर | 20,000 रुपये | 5000 रुपये |
उडीद | शिरूर | 20,000 रुपये | 5000 रुपये |
भुईमूग | हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, पुरंदर | 40,000 रुपये | 3,200 रुपये |
सोयाबीन | इंदापूर, जुन्नर, खेड, बारामती, मावळ, आंबेगाव | 49,000 रुपये | 3,920 रुपये |
कांदा | बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर | 80,000 रुपये | 6,400 रुपये |