कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता; GR निर्गमित दि.26.09.2025

कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता; GR निर्गमित दि.26.09.2025

केंद्र शासनाने अ.क्र. १० येथील दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ च्या ज्ञापनान्वये केंद्र शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वाहतूक भत्त्याच्या अनुषंगाने प्रचलित सर्व सूचनांचे एकत्रिकरण करून सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर कर्तव्यस्थानाच्या एक किलोमीटर अंतराच्या आत वा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारीत दराने अनुज्ञेय करण्याची बाब विचाराधीन होती.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचे वरील अ. क्र. ९ येथील वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २०.०४.२०२२ मधील तक्ता क्र.१ व २ (अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या

शासन निर्णय GR निर्गमित पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विकाराने पिडीत असणाऱ्या तसेच मूकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या दिव्यांग कर्मचारी) नुसार वाहतूक भत्त्याचे दर दिनांक ०१/०४/२०२२ पासून सुधारित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील नियमांच्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार दिव्यांगजनांच्या पूर्वीच्या ७ प्रवर्गाव्यतिरिक्त १४ अन्य प्रवर्गाचा समावेश केला असून त्यानुसार २१ दिव्यांग प्रवर्ग खालीलप्रमाणे आहेतः-

१. Blindness-(पूर्णतः अंघ)

२. Low-vision (अंशतः अंध)

३. Leprosy cured (कुष्ठरोग निवारित/मुक्त)

  1. Hearing Impairment( deaf & hard of hearing) (कर्णबधिर/ऐकू कमी येणे)

५. Locomotor Disability-(अस्थिव्यंग)

६. Intellectual disability- (बौध्दीक अक्षम)

७. Mental Illness (मानसिक वर्तन/मानसिक आजार)

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये नव्याने समाविष्ट १४ दिव्यांग प्रवर्ग

८. Cerebral Palsy- (मेंदुचा पक्षाघात)

९. Dwarfism- (शारिरीक वाढ खुंटणे)

१०. Autism Spectrum disorder- (स्वमग्न)

११. Muscular Dystrophy and Spinal Deformity (स्नायुंची विकृती व पाठीचा कणा विकृती)

१२.Chronic Neurological condition- (मज्जासंस्थेचे तीव्र आजार)

१३. Specific Learning Disabilities- (विशिष्ट अध्ययन अक्षम)

१४. Multiple Sclerosis (हातापायातील स्नायू कमजोर/शिथिल होणे)

१५. Speech & Language Disability- (वाचा व भाषा दोष)

१६. Thalassemia- (रक्तातील कमतरता)

१७. Haemophilla- (अधिक रक्तस्राव)

१८. Sickle cell disease- (रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे)

१९. Multiple Disabilities (बहुविकलांग)

२०. Acid Attack victims-(आम्ल हल्ला पिडित)2/5

२१. Parkinson’s disease-(कंपवात)

राज्य शासनाच्या वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक २० एप्रिल, २०२२ च्या परिच्छेद २ च्या (एक) मधील तरतूदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता अनुज्ञेय असणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. तथापि राज्य शासनाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १४/१२/१९९८ अन्वये व म.ना.से. (सुधारीत वेतन) नियम, २००९ अन्वये सुधारीत वेतनसंरचना लागू केल्याच्या अनुषंगाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ५/०४/२०१० अन्वये वाहतूक भत्त्याचे दर सुधारीत केल्यानंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ७/०९/२०११ अन्वये कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांचा एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असेल अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण दराने वाहतूक भत्ता, सदर आदेशातील अन्य अटींच्या अधीन राहून, अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.

वित्त विभाग, दिनांक २० एप्रिल, २०२२ च्या शासन निर्णयान्वये वाहतूक भत्त्याचे दर सुधारीत करताना अ.क्र.१ येथील दिनांक ०५/०४/२०१० चा शासन निर्णय व दि ०७/०९/२०११ चे शासन शुध्दिपत्रक अधिक्रमित केलेले नाही. सदर शुध्दिपत्रकातील तरतूदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांचा एकत्र परिसर असेल अशा ठिकाणी राहणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे ही तरतूद वित्त विभाग, दिनांक २० एप्रिल, २०२२ च्या शासन निर्णयानंतरही लागू आहे. त्यामुळे दिनांक २० एप्रिल, २०२२ नंतरही दिव्यांग कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून एक कि.मी. अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांचा एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्य असेल तर पूर्वीप्रमाणेच सर्वसाधारण दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे.

३ सद्यस्थितीत, केंद्र शासनाच्या वरील अ.क्र. १० येथील दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ च्या ज्ञापनातील परिच्छेद ५ मधील ५.४ नुसार केंद्र शासनातील पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतराच्या आत शासकीय / खाजगी निवासस्थानात राहत असेल किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील अशी तरतुद केली आहे. सदर तरतूदीस अनुसरून राज्य शासनातील व इतर पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकिय निवासस्थानात वास्तव्यास असतील त्यांना वित्त विभाग, दिनांक २० एप्रिल, २०२२ च्या शासन निर्णयान्वये तक्ता २ व त्याखालील तरतूदीनुसार अनुज्ञेय केलेल्या दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील. सदर तरतूद या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येईल.

४. तसेच वाहतूक भत्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतूदी, अटी, शर्ती व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे लागू राहतील.

Leave a Comment