ऑक्टोबर पगार दिवाळीपूर्वीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक ॥ राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज
राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर 2025 चा पगार संदर्भात या वेळेची मोठी बातमी समोर आली आहे. माहे ऑक्टोबर 2025 चा पगार दिवाळीपूर्वी करण्यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर 2025 चा पगार दिवाळी पूर्वी करण्यासंदर्भात ‘शालार्थ प्रणालीमध्ये ‘संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने, सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत एक महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत शालार्थ प्रणालीमध्ये पे-बिल पुढे पाठवण्यासाठी ‘संचमान्यता’ प्रणालीसो जोडलेली नविन प्रक्रिया अलीकडेच लागू करण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार, पे-बिल पुढील स्तरावर (DDO Level 2) पाठवताना प्रणाली आपोआप संचमान्यता मधील मंजूर पदे आणि पे-बिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या तपासत आहे. जर पदांची संख्या न जुळल्यास बिल थांबते व संबंधित कार्यालयाकडे विशेष मंजुरीसाठी पाठवावी लागते. त्यामुळे विविध शाळांचे पे-बिल अडकले असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचायांच्या दिवाळीपूर्वीच्या वेतनात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर खालील मागण्या विचारात घेऊन आवश्यक कार्यवाही करावी.
- सध्याची प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, जेणेकरून वेतननिर्मितीची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.
- दिवाळीपूर्वी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांचे वेतन जुन्या पद्धतीनुसार तात्काळ अदा करण्यात यावे.
- नवीन प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्यात यावी, सर्व प्रशासकीय अडचणी दूर होऊन संबंधित अधिकान्यांना पुरेसा वेळ व प्रशिक्षण दिले जाईल.
तरी ‘शालार्थ प्रणालीमध्ये ‘संचमान्यता’ प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बिल प्रक्रियेमुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्याने सदर प्रक्रिया दिवाळीनंतर लागू करण्याबाबत कार्यवाही व्हावी.