10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! तब्बल 7,150 पदांची महाभरती सुरू
भारतीय विमानतळ सेवा (Bhartiya Aviation Services) यांच्या मार्फत दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 7,150 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दि. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावा.
या भरती अंतर्गत दोन प्रमुख पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत — कस्टमर सेवा एजंट (Customer Service Agent – CSA) आणि लोडर / हाऊसकीपिंग (Loader / Housekeeping). यामध्ये सर्वाधिक 5,168 पदे कस्टमर सेवा एजंटसाठी असून 1,982 पदे लोडर/हाऊसकीपिंगसाठी राखीव आहेत.
✈️ पदांचा तपशील :
- कस्टमर सेवा एजंट (CSA) – 5,168 पदे
- लोडर / हाऊसकीपिंग – 1,982 पदे
👉 एकूण पदसंख्या : 7,150
📘 शैक्षणिक अर्हता :
- कस्टमर सेवा एजंट (CSA) – उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
- लोडर / हाऊसकीपिंग – उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
💰 वेतनमान :
- कस्टमर सेवा एजंट (CSA) – ₹14,000 ते ₹28,000 पर्यंत
- लोडर / हाऊसकीपिंग – ₹12,000 ते ₹18,000 पर्यंत
📝 अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी निर्धारित कालावधीतच अर्ज पूर्ण करावा.
👉 अर्ज सादर करण्यासाठी :
- पद क्र. 01 – [Click Here]
- पद क्र. 02 – [Click Here]
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.