लाडक्या बहिणींना एप्रिलचा ₹1500 हप्ता या दिवशी मिळणार, तारीख पहा

महाराष्ट्र सरकारच्या “माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत एप्रिल 2025 मध्ये दहावा हफ्ता लाभार्थी महिलांना वितरित केला जाणार आहे. आतापर्यंत या योजनेतून नऊ हफ्ते दिले गेले असून, दहावा हफ्ता अक्षय तृतीयेच्या (30 एप्रिलच्या) आधी दोन टप्प्यांमध्ये वितरित केला जाईल.

पहिला टप्पा 24 एप्रिल 2025 पासून सुरू होईल, ज्यामध्ये 1 कोटी महिलांना हफ्ता मिळेल, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महिलांना थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.

योजनेचे फायदे व पात्रता

प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, ज्या महिलांना “नमो शेतकरी सन्मान योजना” अंतर्गत आधीपासून 1000 रुपये मिळतात, त्यांना फक्त 500 रुपयेच लाडकी बहिण योजनेतून मिळतील.

पात्रता अटी

अर्ज “Approved” असणे आवश्यक

महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी

कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून दुसरा चारचाकी वाहन नसावा

वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे

कुटुंब आयकरदाता नसावा आणि शासकीय नोकरीत नसावा

इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल

नऊ लाख महिलांचे अर्ज नाकारले

राज्य सरकारने पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या 9 लाख महिलांचे अर्ज नाकारले आहेत. या महिलांना एप्रिल महिन्याचा दहावा हफ्ता मिळणार नाही. योजनेची अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन अर्जाची स्थिती “Approved” की “Rejected” आहे, ते महिलांनी तपासावे.

हप्ता तपासण्याची प्रक्रिया

वेबसाईटला भेट द्या: ladakibahin.maharashtra.gov.in

अर्जदार लॉगिन करा (मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाका)

“Application made earlier” वर क्लिक करा

“Application Status” तपासा

“Actions” मध्ये रुपये चिन्हावर क्लिक करा

“Transaction log” मधून एप्रिल हफ्त्याची माहिती मिळेल

तक्रार नोंदवण्यासाठी

जर हफ्ता मिळाला नसेल, तर 181 हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा किंवा वेबसाईटवरून Grievance Form भरून तक्रार नोंदवा.

Leave a Comment