LPG Gas Cylinder Price Decrease : खुशखबर! 1 जून पासून गॅस सिलेंडर झाले अगदी स्वस्त, नवीन दर लागू

महागाईने त्रस्त झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आजपासून देशभरात एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे.

१ जूनपासून दिल्लीत ६९.५० रुपये, कोलकातामध्ये ७२ रुपये, मुंबईत ६९.५० रुपये, आणि चेन्नईत ७०.५० रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
IOCL च्या वेबसाइटनुसार, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती आजपासून कमी करण्यात आल्या आहेत. सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. याआधी एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला देखील दर कमी करण्यात आले होते.

नवीन दर असे आहेत: –
- दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता १७४५.५० रुपयांऐवजी १६७६ रुपये आहे.
- कोलकातामध्ये १९ किलोचा एलपीजी सिलेंडर आता १८५९ रुपयांऐवजी १७८७ रुपयांना मिळणार आहे.
- मुंबईत या सिलेंडरची किंमत १६९८.५० रुपयांऐवजी १६२९ रुपये झाली आहे.
- चेन्नईमध्ये १९११ रुपयांचा सिलेंडर आता १८४०.५० रुपयांना मिळणार आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत घरगुती सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळत आहे. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत कमी केली होती.