मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ कामगारांना दिला जातो जसं की मित्रांनो आरोग्य चेकअप भांडी संच घरकुल शिक्षणासाठी सवलत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे दिल्या जातात अशीच एक सवलत सध्या दिली जात आहे
ज्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना खूशखबर सांगायची आहे. आपल्या सरकारने तुमच्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. यालाच भांडी संच योजना असे म्हटले जाते. या योजनेमुळे आपल्याला घरामध्ये वापरायची अनेक भांडी विनामूल्य मिळणार आहेत. तुम्ही सगळेच या योजनेचा फायदा घेऊ शकता.
कोणाला मिळणार आहेत ही भांडी?
जे बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत, त्यांनाच ही भांडी मिळणार आहेत. म्हणून जर तुमची नोंदणी केलेली नसेल तर लगेचच ती करून घ्या. नोंदणी कशी करायची याबद्दल तुम्ही तुमच्या कंत्राटदारांकडे किंवा सरकारी कार्यालयात विचारू शकता.
कोणती भांडी मिळणार आहेत?
या योजनेमध्ये तुम्हाला पुढील भांडी मिळणार आहेत:
- चार नंग्या ताट
- चार पाणी पिण्याची ग्लास
- तीन पातेले व त्यांच्यासाठी झाकणे
- भात वाढण्यासाठी एक मोठा चमचा
- २ लिटर पाणी भरण्यासाठी एक जग
- स्टीलची काढई
- ५ लिटर क्षमतेचे स्टेनलेस स्टीलचे कुकर
- टाकी
वरील सगळ्या भांड्या तुम्हाला विनामूल्य मिळतील. त्यामुळे घरात भांडी वापरण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागणार नाही.
काय करायचे आहे भांडी संच मिळवण्यासाठी?
भांडी संच मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यात तुमचे फोटो, बोटांचे ठसे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत. तसेच तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीकृत असल्याचा पुरावा देणे आवश्यक
जेव्हा तुम्ही ही कागदपत्रे जमा कराल तेव्हा तुमच्या घरी भांड्यांचा संच येईल. तुम्हाला त्याचा कुठलाही खर्च करावा लागणार नाही. ही सरकारची सोय तुमच्यासाठीच आहे.
म्हणून मित्रांनो, लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि घरासाठी आवश्यक भांडी मिळवा. तुमच्यामुळे घरकामाचे काम सोपे होईल आणि तुमच्यावर पैशांचा भार पडणार नाही. या सरकारी योजनेचा फायदा घ्या आणि आनंदात राहा.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज मोफत
तर मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगाराची नोंदणी करून कशाप्रकारे भांडी संच मिळू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहिजे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी योजना अत्यंत लाभदाय काय कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा लाभ या योजनेद्वारे दिला जातोय अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या साईटला नक्की भेट देत जा.
Team Thodkyaatnews.com