मोठी अपडेट : दहावीच्या निकालाची तारीख ठरली! या दिवशी लागणार 10 वी चा निकाल!

Maharashtra board ssc result 2024 : राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली आहे. विशेष म्हणजे या परीक्षेची जय्यत तयारी बोर्डाकडून करण्यात आली आहे. या वर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. आता पुढच्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागेल याची घोषणा ही बोर्डाकडून केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या वर्षी बारावीच्या निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे. यंदाही दरवेळी प्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारली आहे. या ही वर्षी कोकण विभाग निकालात अव्वल ठरला आहे. तब्बल तेरा वर्ष निकालात कोकण विभाग अव्वल आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

येथे पहा दहावीचा निकाल

अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजूनही दहावीच्या निकालाबद्दलची तारीख ही जाहीर करण्यात आली नाही; परंतु मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच दहावीच्या निकालाबद्दलचे अपडेट शेअर करतील. 30 मे ला दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी एक चर्चा आहे. मात्र, अजूनही बोर्डाकडून दहावीच्या निकालाबद्दलचे कोणतेही अपडेट आले नाही.

Leave a Comment