महिला व बाल विकास विभाग भरती 2024 – 236 रिक्त पदांची भरती सुरू
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्याच्या आयुक्तालयांतर्गत 236 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 2024 साठी असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. या भरतीबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
महिला व बाल विकास विभाग भरती 2024: महत्त्वाच्या बाबी
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- रिक्त जागा: 236
- नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्रभर
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024
- अर्ज प्रक्रिया संपण्याची तारीख: 10 नोव्हेंबर 2024
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 3 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट
pdf जाहिरात पहा
जाहिरात १
जाहिरात २
महिला व बाल विकास विभाग भरती 2024 साठी रिक्त पदांची यादी
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
संरक्षण अधिकारी, गट ब | 02 |
परिविक्षा अधिकारी, गट क | 72 |
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 01 |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट क | 02 |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट क | 56 |
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क | 57 |
वरिष्ठ काळजी वाहक, गट ड | 04 |
कनिष्ठ काळजी वाहक, गट ड | 36 |
स्वयंपाकी, गट ड | 06 |
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. खालील तक्त्यामध्ये पदांनुसार पात्रता दिली आहे:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
संरक्षण अधिकारी, गट ब | समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी व 3 वर्षे अनुभव |
परिविक्षा अधिकारी, गट क | कोणत्याही शाखेतील पदवी |
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट क | 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट क | कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी |
वरिष्ठ काळजी वाहक, गट ड | 10वी उत्तीर्ण, उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी |
कनिष्ठ काळजी वाहक, गट ड | 10वी उत्तीर्ण, उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच |
स्वयंपाकी, गट ड | 10वी उत्तीर्ण |
निवड प्रक्रिया
महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
वयोमर्यादा
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे असून, जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्षे आहे. काही विशेष प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
अर्ज फी
- सामान्य प्रवर्ग: ₹00
- OBC, EWS, SC, ST, PWD, महिला: ₹00
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम, महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना पूर्ण वाचा आणि पात्रता निकष तपासा.
- “New Registration” वर क्लिक करा.
- सर्व आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्या.
वरील सर्व तपशील वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.