प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹2000) दिली जाते. आतापर्यंत 19 हप्ते मिळाले असून, 20वा हप्ता जून 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे.
ई-केवायसी आवश्यक
या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी 30 एप्रिल 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर हे काम पूर्ण नसेल, तर पुढील हप्ता थांबू शकतो.
आधार व बँक खात्याची लिंकिंग
शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार मोबाईल नंबरशी लिंक असावा आणि तो मोबाईल नंबर बँक खात्यासोबत नोंदलेला असावा. यामध्ये विसंगती असल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.
भूमी सत्यापन आवश्यक
पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 एप्रिल 2025 पूर्वी त्यांचं भूमी सत्यापन (लँड व्हेरिफिकेशन) पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम ऑनलाइन पीएम किसान पोर्टलवर किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन करता येईल. त्यासाठी खसरा नंबर, भूखंड नंबर यांसारखे जमीनविषयक कागद अपलोड करावे लागतील किंवा CSC मध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी लागेल.