प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आधी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती, मात्र केंद्र सरकारने आता ती वाढवून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत केली आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया आता अनिवार्य केली आहे. बँक खात्याचे केवायसी असो किंवा सरकारी योजना लाभासाठी, प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक झाले आहे. त्यातच रेशनकार्डसाठी देखील ई-केवायसी आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु संपूर्ण लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे केंद्र सरकारने आणखी एकदा मुदतवाढ दिली आहे.
केशरी, पांढरे, आणि पिवळे रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२४ आहे. यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांच्या सोयीसाठी रेशन दुकानदारांनी ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये फोर-जी ई-पॉस मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे आधार क्रमांक वापरून ई-केवायसीची प्रक्रिया केली जात आहे. त्यामध्ये बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण केली जाते.
सरकारच्या निर्णयानुसार, प्रत्येक शिधापत्रिका धारकाने ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याने ही पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.