मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे दिवाळी बोनस जाहीर.State Employees Diwali Bonus
State Employees Diwali Bonus:बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीपावली 2025 निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि संबंधित शिक्षक-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर केले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत घोषणा केलीय.
विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये, तर काही विशिष्ट गटांना भाऊबीज भेट म्हणून 5 हजार ते 14 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयनानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय.
सर्वसमावेशक बोनस योजना
BMC ने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त 31 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांचा समावेश आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असल्याचे म्हटलं जातंय.
शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लाभ
पालिकेच्या आणि खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षण सेवक आणि माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते आणि पूर्णवेळ शिक्षण सेवकांनाही याच रकमेचा लाभ मिळेल.
भाऊबीज भेटीचा विशेष समावेश
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांना भाऊबीज भेट म्हणून १४ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांना ५ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही भेट कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवेल.
सणासुदीच्या काळात आर्थिक आधार
BMC च्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि शिक्षकांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळेल. दीपावलीच्या खरेदी आणि उत्सवासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल, ज्यामुळे कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असं म्हंटल जातंय.