10th – 12th board result date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले असून, “निकाल कधी लागणार?” हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीचा निकाल मे 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांत दहावीचा निकाल देखील जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर तो महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahresult.nic.in) पाहता येईल. दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाढतो, ज्यामुळे काही वेळा वेबसाइट स्लो होते किंवा उघडत नाही. यावेळी मात्र अशी अडचण उद्भवू नये म्हणून आयटी विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे व सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमित लोड टेस्टिंग व सायबर सुरक्षा तपासणी करून वेबसाइट अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येण्याची शक्यता कमी आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर तयार ठेवावा.