Pik vima news:शेतकरी मित्रांनो, पिकविम्याचा मुद्दा अनेकदा तुमच्यासमोर येत असतो. पिकविमा हा शासनाचा शेतकऱ्यांसाठी असलेला महत्त्वाचा आधार आहे. पीक नापीक झाल्यास शेतकऱ्यांना पिकविम्याद्वारे नुकसान भरपाई मिळते. परंतु पिकविम्याच्या वाटपात अनेकदा अडचणी येतात आणि शेतकरी हवालदील होतो.
राज्यात 25% pik vima वाटप झाले असून आता पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानंतर पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पिकविमा वाटप सुरू आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांना अग्रिम पिकविम्याचे पैसे मिळाले आहेत. आणि 75% पिकविमा शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे. आतापर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पिकविम्याचे पैसे का आले नाहीत.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पिकविमा न मिळण्याची कारणे आणि तुमच्याकडून झालेल्या चुका समजून घेऊया. तसेच तुम्हाला पिकविमा मिळाला का व मिळणार का याबाबत संपूर्ण माहिती पाहूया.
शासनाच्या नवीन नियमानुसार आता सर्व प्रकारचे सरकारी योजना तसेच पिकविमा, नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान हे सर्व पैसे DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे तुमचे कोणते खाते आधारशी लिंक आहे त्या खात्यात पिकविमा मिळाला का हे तपासणे महत्त्वाचे आहे. पिकविमा भरताना कोणतेही खाते क्रमांक दिले असले तरी पिकविमा फक्त आधार लिंक खात्यात जमा होणार आहे.
पिकविमा न मिळण्याची कारणे:
- तुमचा पिकविमा अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा त्रुटीमुळे अर्ज नामंजूर झाला असेल तर तुम्ही पिकविम्याच्या लाभापासून वंचित राहणार.
- तुमच्या आधारशी कोणते बँक खाते लिंक आहे हे तपासून त्या खात्यात पिकविमा मिळाला का हे तपासावे.
- काही जिल्ह्यात सोयाबीन तर काही जिल्ह्यात कापूस किंवा इतर पिकांसाठी पिकविमा मंजूर झाला आहे. तुम्ही कोणत्या पिकासाठी पिकविमा भरलेल्या आहेत त्या पिकासाठी आपल्या महसूल मंडळात पिकविमा मंजूर झाला आहे का हे तपासणे गरजेचे आहे.
- विमा कंपनीच्या नियमानुसार ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-पीक पाहणी केली नसेल तर तुम्ही पिकविमा लाभापासून वंचित राहू शकता.
पिकविमा स्थिती तपासणे:
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अजून पिकविमा मिळाला नसेल तर तुम्हाला पिकविमा मिळणार का याची माहिती विमा कंपनीला थेट कॉल करून विचारू शकता. तुम्हाला दिलेल्या पीक विमा नोंदणी पावती वरील हेल्पलाईन नंबर वरती आपण तुमच्या विम्याची स्थिती पाहू शकता. कंपनीकडून तुम्हाला पिकविमा मिळाला का? मिळणार का? तसेच कोणत्या पिकासाठी किती पिकविमा रक्कम मिळाली याबाबत संपूर्ण माहिती मिळू शकेल.
शेवटी, पिकविमा योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, ऑनलाइन अर्ज करणे व नियमितपणे स्थिती तपासणे गरजेचे आहे. जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तत्काळ विमा कंपनी व सरकारी यंत्रणेशी संपर्क साधून समस्येचे निराकरण करा.