सोने प्रति तोळा 700 रुपये तर चांदी प्रति किलो 2500 रुपयांनी वधारली, पहा नवीन दर

GOLD-SILVER UPDATE TODAY : मागील महिन्यात 17 एप्रिल रोजी 74,200/- रुपयांवर पोहचलेल्या सोन्याचे भाव नंतर कमी होत जाऊन ते 71, 600 रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर पुन्हा वाढ सुरू झाली व एक महिन्यानंतर म्हणजेच 18 मे रोजी पुन्हा 74,400 रुपयांवर पोहचले.

निराधार निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत हे का करा, नाहीतर मोबदला मिळणार नाही.

दिनांक 20 मे रोजी सोन्यामध्ये पुन्हा 700 रुपयांची वाढ होऊन सोने 75,100 रुपये प्रति तोळा झाले आहे. 18% GST सह एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 77, 353/- रुपये मोजावे लागणार आहेत.

तसेच २० मे रोजी चांदी मध्ये तब्बल 2,500 रुपयांच्या वाढीसह चांदी 92,500 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. एक किलो चांदीसाठी 18% GST सह 95,275 रुपये मोजावे लागणार आहे.

गॅस धारकांनी हे काम करा नाहीतर, गॅस कनेक्शन आणि सबसिडी होईल बंद

सोने-चांदीची भाववाढ पुन्हा वेगाने सुरू झाली असून दिनांक 20 मे रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात 2500 रुपयांची वाढ होऊन ती 92,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात 700 रुपयांची वाढ होऊन ते 75,100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

मे महिन्यात का वधारले दर?

अमेरिकत सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने तसेच चीननेही सोने खरेदी वाढवल्याने मार्चपासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ चांदीचीही खरेदी वाढल्याने तिचेही भाव वाढू लागले. एप्रिलमध्ये भाववाढ कायम राहिली, मात्र एप्रिलच्या अखेरपासून भाव काहीसे कमी झाले. मे महिन्यात भाव पुन्हा एकदा वाढू लागले.

आणखी माहिती करिता येथे क्लिक करा

Leave a Comment