महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Mansoon Alert : मान्सून दाखल झाल्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला. सलग दोन-तीन दिवस वादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, मागील दोन दिवसांपासून काही भागांत पाऊस थांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट Rain Alert in Maharashtra

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे पसरायला २० जूनपर्यंत वेळ लागू शकतो. तरीही, आजपासून पुढील ५ दिवस काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज शनिवारी दक्षिण कोकणात जोरदार पाऊस पडेल. उत्तर कोकणातही जोरदार सरी बरसतील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी जमिनीत ६ इंच खोल ओल येईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस?

IMD च्या अंदाजानुसार, आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातही जोरदार सरी बरसतील. धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

पावसासोबतच वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे, ज्याचा वेग 30-40 किमी प्रतितास असू शकतो, असे आयएमडीने सांगितले आहे. पुढील २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment