Ladki Bahin Yojana 6th installment : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु निवडक महिलांना मिळणार
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 3 कोटी अर्ज, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने, सरकारकडे प्राप्त झाले होते. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून अर्जांची तपासणी करून 2 कोटी 34 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळाला नाही का? मग हे काम करा
अजूनही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांची स्थिती
अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले असले तरी त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. या महिलांना पुढील हप्त्यात किती रक्कम मिळणार आहे, तसेच ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर होण्याची तारीख यासंबंधीची माहिती उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ऑक्टोबर महिन्यातील अर्जांचे मंजुरीचे वेळापत्रक
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली होती, जेणेकरून कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये. या कालावधीत सादर केलेल्या अर्जांचे डिसेंबर महिन्यात मंजुरी प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये 9600 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार
तालुकास्तरीय समितीकडून मंजूर झालेल्या अर्जांपैकी अनेक महिलांना योजनेच्या हप्त्यांचा लाभ अद्याप मिळालेला नाही. अशा महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे की महायुतीचे सरकार स्थापनेनंतर उर्वरित हप्ते 7500 रुपये आणि वाढीव हप्त्याची रक्कम 2100 मिळून एकूण 9600 रुपये त्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्यात जमा केले जातील.
2100 रुपये मिळण्याची शक्यता असलेल्या महिला
सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे या योजनेच्या लाभ वितरण प्रक्रियेत तात्पुरता खंड पडला आहे. महायुती सरकारने महिलांना आश्वासन दिले आहे की सरकार पुन्हा आल्यास या योजनेचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल. त्यामुळे सहाव्या हप्त्यांमध्ये महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.