Ladki bahin april installment update : लाडक्या बहिणींना एप्रिल मध्ये ₹2100 मिळणार की ₹1500; जाणून घ्या नवीन अपडेट

Ladki bahin april installment update : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांना दीड हजार रुपये दिले जातात.

विधानसभा निवडणुका अगोदर राज्याचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की आम्ही निवडून आल्यावर सदर रकमेत बदल करून प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देऊ; परंतु विधानसभा निवडणुका होऊन पाच महिने उलटली आणखीन सदरील रकमेत वाढ झाली नाही; परंतु पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना नियमितपणे त्यांच्या खात्यात जमा होत आहे.

एप्रिल महिन्यात लाभार्थी महिलांना दहाव्या हफ्त्याचे १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराश्रित महिलांना दरमहिन्याला आर्थिक मदत दिली जाते. योजना २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती.

राज्य शासनाने या योजनेसाठी ३५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एप्रिल महिन्याची दहावी हफ्त्याची रक्कम २४ एप्रिलपासून तीन टप्प्यांमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १ कोटी महिलांना, दुसऱ्या टप्प्यात आणखी १ कोटी महिलांना, तर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ४१ लाख महिलांना लाभ दिला जाईल. Ladki bahin yojana april installment date

ज्या महिलांना मार्च महिन्याचा हफ्ता मिळालेला नाही, अशा महिलांना एप्रिलमध्ये ९वा आणि १०वा हफ्ता मिळून एकूण ३००० रुपये मिळतील. मात्र, यासाठी लाभार्थीचे खाते आधारशी लिंक असणे आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज अयोग्य ठरवण्यात आले असून त्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम जमा होणार नाही. यामध्ये चुकीची माहिती अथवा कागदपत्रे दिलेल्या महिलांचा समावेश आहे.

लाभार्थ्यांना आपली हफ्त्याची रक्कम मिळाली की नाही, हे तपासण्यासाठी योजना पोर्टलवर लॉगिन करून “Application made earlier” विभागातून स्टेटस पाहता येईल. तसेच, संबंधित नगरपालिकेच्या संकेतस्थळावर लाभार्थी सूची (PDF) डाउनलोड करून आपले नाव तपासता येईल.

Leave a Comment