12th board result 2025 : महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालाची सर्वच विद्यार्थी वाट पाहत आहेत. बारावीचा निकाल कधी लागणार याची सगळ्या विद्यार्थ्यांना आस लागली आहे. 12वी चा निकाल कधी लागणार या बाबत पुढे विश्लेषण केले आहे.
निकाल जाहीर होण्याची शक्यता 12th board result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२वीचा निकाल मे महिन्याच्या मध्यभागी म्हणजेच १५ मे २०२५ रोजी किंवा त्याआधी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन वेगाने पूर्ण झाले असल्याने निकाल लवकर लागण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता.
परीक्षा कालावधी
बारावीच्या परीक्षा राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान पार पडल्या. आता विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, देश-विदेशातील शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करत असल्याने, निकाल वेळेत जाहीर होणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळाने निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.
निकाल जाहीर होण्याची अपेक्षित वेळ
दुपारी १ वाजता
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
ऑनलाईन निकाल पाहण्याची प्रक्रिया
- mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
- आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर आपला निकाल दिसेल. तो PDF स्वरूपात डाउनलोड करा.
SMS द्वारे निकाल कसा पाहावा?
मोबाइलमध्ये MHSSC असे टाईप करून 5776 या क्रमांकावर पाठवा. उत्तरादाखल निकाल मिळेल.
वेबसाईटवर लोड कमी करण्यासाठी उपाययोजना
दरवर्षी निकाल जाहीर होताच वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येतो. यामुळे अनेक वेळा वेबसाईट स्लो होते किंवा अॅक्सेस न होण्याची समस्या निर्माण होते. यंदा अशा अडचणी टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. वेबसाइटवर लोड टेस्टिंगसह सुरक्षेचे पातळीवर काम सुरु असून, आयटी विभागाकडून सात दिवसांत सविस्तर सुरक्षा अहवाल मागवण्यात आला आहे.