free-flour-mill-yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वबळावर उभं राहता यावं, त्यांना पैसे कमवता यावेत. या योजनेत सरकार काही महिलांना मोफत पिठाची गिरणी देत आहे. ही गिरणी वापरून त्या महिलांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो.
गावातल्या महिलांना मदतीचा हात
सरकारकडून 90% अनुदान
कोण अर्ज करू शकतं?
या योजनेसाठी अर्ज करताना काही नियम पाळावे लागतात:
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- ती SC (अनुसूचित जाती) किंवा ST (अनुसूचित जमाती) गटातील असावी.
- वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
- तिच्या कुटुंबाचे वर्षाला उत्पन्न 1.20 लाखांपेक्षा कमी असावे.
- गावात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाते.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
महिलांनी या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे द्यावी लागतात:
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याची माहिती
- गिरणी विकणाऱ्या दुकानाचं कोटेशन (भावपत्र)
या गिरणी व्यवसायाचे फायदे
- नेहमी पैसे मिळवण्याचा एक मार्ग तयार होतो.
- कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.
- घराबाहेर न जाता काम करता येतं.
- दुसऱ्या महिलांनाही काम देऊन मदत करता येते.
- गावातील लोकांना पीठ मिळतं आणि गावाची अर्थव्यवस्था वाढते.
अर्ज कसा करायचा?
- अर्ज ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालयातून मिळवता येतो.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावा.
- अर्जाची छाननी झाल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांना गिरणी खरेदीसाठी अनुदान मंजूर केले जाते.