Bank Holiday Update : 5 नोव्हेंबर पासून सलग ५ दिवस बँका बंद राहणार, पाहा सविस्तर अपडेट
नोव्हेंबर महिन्यात बँकांची सुट्टी मोठ्या प्रमाणात लागणार आहे. उद्यापासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून ९ नोव्हेंबरपर्यंत सलग पाच दिवस बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी नसून, RBI च्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना असतील. त्यामुळे बँकिंगचे कामकाज करण्यापूर्वी ही यादी नक्की तपासा.
५ नोव्हेंबर (बुधवार) रोजी देशभरात गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. तर गुजरात, केरळ, बिहार, गोवा, कर्नाटक आणि उत्तर पूर्वेकडील काही राज्यांमध्ये बँका सुरू राहतील.
६ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी बिहार आणि मेघालय येथे बँका बंद राहतील. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आणि मेघालयमध्ये नोंगक्रेम डान्स फेस्टिव्हल साजरा होणार असल्याने त्या दिवशी बँकिंग सेवा बंद असतील.
७ नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी मेघालय राज्यात वांगला फेस्टिव्हल असल्यामुळे तेथील बँका बंद राहतील. इतर सर्व राज्यांमध्ये त्या दिवशी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
८ नोव्हेंबर (शनिवार) हा दुसरा शनिवार असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. तसेच या दिवशी कनकदास जयंती असल्यामुळे कर्नाटक राज्यातील बँकाही बंद राहतील.
९ नोव्हेंबर (रविवार) हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
मात्र या काळात ग्राहकांना ATM, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI सेवा या सर्व डिजिटल सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील. त्यामुळे तुम्हाला जर बँक शाखेत जाऊन काही महत्वाचे काम करायचे असेल, तर सुट्ट्यांची ही यादी पाहूनच नियोजन करा.