भारतीय शेतकरी आजही अनेक अडचणींना सामोरे जात आहे. विशेषतः वीज पुरवठा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठ्यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ या नवीन उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दरात सौर ऊर्जेचा पुरवठा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी जमिनीची उपलब्धता देखील झालेली आहे. यासाठी 8000 मेगावॅट वीज निर्मितीच्या निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी झाली आहे. या प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी सरकारने कंपन्यांना 8 महिन्यांची मुदत दिलेली आहे..
या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा होणार आहे. यामुळे शेतीला योग्य वेळी पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
Solar Yojana:महावितरण द्वारे मागेल त्याला सोलर भेटणार ; अशी आहे संपूर्ण प्रोसेस पहा
दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांना 7 रुपये प्रति युनिट दराने वीज मिळते. परंतु या निविदांमध्ये 2 रुपये 90 पैसे ते 3 रुपये 10 पैसे प्रति युनिट या दराने वीज उपलब्ध करून देण्याचे नमूद केले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना वीज दीड रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. हा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर चांगला परिणाम करणारा निर्णय ठरणार आहे.
तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे सौरऊर्जा हे पर्यावरणपूरक असल्याने शेतीमध्ये दीर्घकालीन फायदा होणार आहे. सौरऊर्जेमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईल. त्यामुळे निरोगी वातावरणात पिके मोठी होतील आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले तर सौरऊर्जा हा शेतीसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर याचा विपरीत परिणाम होणार नाही तर त्यांना दीर्घकालीन फायदा होणार आहे. शासनाच्या या पावलामुळे शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येण्याची शक्यता आहे.