Government Employees GR : सध्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि इतर प्रशासनिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरण्यात येते. भविष्यात या प्रणालीचा इतर शासकीय प्रणालींशी समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती ही पूर्ण, अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासन — वित्त विभाग दिनांक: ९ एप्रिल, २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यासाठी खालील ७ बाबींची माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करणं बंधनकारक करण्यात आले आहे
- मोबाईल क्रमांक
- वैवाहिक स्थिती (Marital Status)
- आईचे नाव
- वडिलांचे नाव
- जोडीदाराचे नाव (Spouse Name)
- पत्ता
- पिन कोड
शासन निर्णय GR पहा
सूचना
- सेवार्थ प्रणालीमध्ये वरील सर्व बाबी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही माहिती पूर्ण केल्याशिवाय नवीन कर्मचाऱ्यांची माहिती प्रणालीत भरता येणार नाही.
- ज्या कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची वरील माहिती अपूर्ण आहे, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. ही प्रक्रिया सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे.
- ही माहिती एप्रिल २०२५ च्या वेतन देयक तयार करण्यापूर्वी अद्ययावत करणे आवश्यक आहे.
- जर माहिती अद्ययावत केली गेली नाही, तर त्या कार्यालयाचे एप्रिल २०२५ (देय मे २०२५) चे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही.
- माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी:
- प्रथम DDO_AST लॉगिन मध्ये माहिती अद्ययावत करावी.
- नंतर DDO लॉगिन मध्ये जाऊन
Worklist Payroll > Changes > Drafts of Changes
या मार्गाने ती माहिती Approve करावी.
- माहिती अद्ययावत केल्यानंतर त्याचा अहवाल सेवार्थ प्रणालीतून तयार होईल. हा अहवाल एप्रिल २०२५ च्या वेतन देयकाबरोबर सादर करणे अनिवार्य आहे.
- जर वरील प्रक्रिया वेळेत पूर्ण केली गेली नाही, तर वेतन देयक स्वीकारले जाणार नाही आणि यासाठी संबंधित DDO व्यक्तिशः जबाबदार राहतील.