DA hike news : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राच्या धर्तीवर वाढ केली जाते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते, असा काही नियम नाही, पण केंद्राच्या धर्तीवर अनेक योग्य निर्णय राज्य सरकार घेत असते. DA hike news
केंद्र सरकारने आताच 28 मार्च 2025 रोजी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वाढीनंतर महागाई भत्ता दर हा 53 टक्क्यांवरून 55 टक्के झाला आहे, आणि ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल. या निर्णयाचा फायदा सुमारे 48.66 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 66.55 लाख केंद्रीय पेन्शनधारकांना होणार आहे.
केंद्र सरकारच्या महागाई भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल हे आपण उदाहरणासह पाहुयात..
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 24,600 रुपये असेल, तर 53 टक्के दराने त्याचा महागाई भत्ता दर 13,038 रुपये होता. आता 55 टक्के दराने तो 13,530 रुपये होईल, म्हणजेच दरमहा 492 रुपयांची पगारात वाढ होईल.
कृपया लक्षात घ्या की ही वाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेते. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची प्रतीक्षा करावी लागेल.
परंतु केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ निश्चित केली जाते, असा काही नियम नाही, पण केंद्राच्या धर्तीवर अनेक योग्य निर्णय राज्य सरकार घेत असते.
म्हणून आताच फेब्रुवारी 2025 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता दर हा 53% होईल. आणि जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 अशी थकबाकी रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे.
त्याच प्रमाणे जुलै 2025 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील 2% महागाई भत्ता वाढ होऊन, महागाई भत्ता 55% होईल.