कर्मचाऱ्यांचे मे पेड इन जून वेतन, निवृत्तीवेतन आणि आस्थापना अनुदान वाटपाबाबत महत्वाचे शासन परिपत्रक

राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि आस्थापना अनुदान वाटपाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 20 मे 2024 रोजी महत्वाचे शासन परिपत्रक काढले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मे 2024 महिन्याचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी शासनाने उपलब्ध केलेल्या तरतुदींच्या मर्यादेत राहून, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांना खर्च करण्याची परवानगी दिली आहे.

सदर परिपत्रकानुसार, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान, आणि कलम 183 नुसार आस्थापना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान प्राथमिक शाळांच्या वेतनासाठी, जिल्हा परिषदांनी चालवलेल्या शाळांसाठी, आणि केंद्रीय प्राथमिक शाळांच्या स्थापनेसाठी वापरता येईल.

या परिपत्रकानुसार, अनुदान फक्त मंजूर उद्देशासाठीच वापरण्यात यावे आणि इतर कोणत्याही उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार, लेखाशिर्षानिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक आणि दिनांकासह, संबंधित अधिकाऱ्यांनी दरमहा 10 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचलनालय कडून कर्मचाऱ्यांचे मे पेड इन जून वेतन, आस्थापना अनुदाने वितरित करणे बाबत 20 मे २०२४ चे परिपत्रक पुढे पाहा

परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment