सोनं आणि चांदीच्या दरात दिवाळीनंतर मोठी घसरण झाल्याचं दिसत आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती, पण आता या किंमती घसरल्या आहेत. सराफा बाजारात, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो मंगळवारच्या ७८,५६६ रुपयांपेक्षा ४६० रुपयांनी कमी आहे. दुसरीकडे, चांदीचा भावही ९१,९९३ रुपये प्रति किलोवर आला आहे, जो मागील दरांपेक्षा कमी आहे.
१४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
आज, 8 नोव्हेंबर रोजी २4 कॅरेट सोनं ४५८ रुपयांनी कमी होऊन ७७,७९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं आहे. २२ कॅरेट सोनं २४४ रुपयांनी कमी होऊन ७१,५४५ रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. १८ कॅरेट सोनं ३४५ रुपयांनी कमी होऊन ५८,७८० रुपये प्रति १० ग्रॅम झालं. १४ कॅरेट सोन्याचा भाव २६९ रुपयांनी कमी होऊन ४५,६९२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
आयबीजेएचे महत्व
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) एक १०४ वर्ष जुनी संस्था आहे, जी दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी करण्यासाठी मानक म्हणून वापरले जातात. आयबीजेएचे कार्यालय २९ राज्यांमध्ये आहेत आणि ती भारतातील अनेक सरकारी संस्थांशी संलग्न आहे.