Gold Rate : सोन्याचे दर 57 हजारांवर येणार? गुंतवणुकीसाठी मोठी संधी! हे आहे कारण

Gold Rate : देशभरात सध्या सोन्याच्या किमती उच्चांक गाठत आहेत. प्रति तोळा सोन्याची किंमत 92 हजार रुपयांपर्यंत पोहोचली असून, यामुळे आधीच गुंतवणूक केलेल्या लोकांचे चेहरे खुलले आहेत. परंतु, ज्यांना अजून गुंतवणूक करायची आहे आणि किंमती कमी होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अमेरिकेतील मॉर्निंगस्टार या वित्तीय सेवा कंपनीचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी एक मोठा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्यानुसार पुढील काही वर्षांमध्ये सोन्याच्या किमती सुमारे 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. जर हा अंदाज खरा ठरला, तर सोन्याची किंमत सुमारे 57 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा भाव प्रति औंस 3132.71 डॉलर इतका आहे, तर मिल्स यांच्या मतानुसार हा दर 1820 डॉलरपर्यंत घसरू शकतो.

या संभाव्य घसरणीमागे अनेक कारणं आहेत. सोन्याच्या किमती वाढल्या की त्याच्या खाणकामात वाढ होते. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणकामाचा सरासरी नफा 950 डॉलर प्रति औंस इतका होता, जो 2012 नंतरचा सर्वाधिक आहे. त्याचबरोबर, मागील वर्षी जागतिक पातळीवर सोन्याच्या साठ्यात 9 टक्क्यांची वाढ झाली असून, अनेक देशांनी उत्पादन वाढवले आहे. याशिवाय जुन्या सोन्याचा पुनर्वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल आणि त्याचा परिणाम किमतींवर होऊन दर खाली येण्याची शक्यता आहे.

जर ही परिस्थिती वास्तवात उतरली, तर भविष्यात सोन्यात गुंतवणुकीसाठी योग्य संधी निर्माण होऊ शकते.

Leave a Comment