सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; हे आहे कारण? आणखी स्वस्त होणार सोनं ! Gold Rate Today
Gold Rate Today:दिवाळीच्या काळात सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. अवघ्या चार दिवसांच्या कामकाजात सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून ७,००० रुपये प्रति १० ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे.
ही घसरण केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारातही नोंदवली गेली आहे. सणासुदीत सोन्याच्या दरात झालेली ही मोठी कपात ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक मोठी खरेदी संधी घेऊन आली आहे.
शेअर बाजारात सोन्याचा दर ७,३६९ रुपयांनी घसरलासोन्याची किंमत सराफा बाजारात नाही तर शेअर बाजारातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर कमी झाली आहे. सोमवार (२० ऑक्टोबर): ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा (५ डिसेंबर एक्सपायरी) वायदा भाव १,३०,६२४ रुपये प्रति १० ग्रॅम होता.शुक्रवार (२४ ऑक्टोबर): सोन्याचा वायदा भाव घसरून १,२३,२५५ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला.एकूण घट: या चार दिवसांत एमसीएक्सवर सोने ७,३६९ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले.
घरगुती बाजारातही मोठा दिलासाइंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, घरगुती सराफा बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली.सोमवार (२० ऑक्टोबर): २४ कॅरेट सोन्याचा दर १,२७,६३३ रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता.शुक्रवार (२४ ऑक्टोबर): हा दर घसरून १,२१,५१८ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला.एकूण घट: घरगुती बाजारात सोन्याचा दर सुमारे ६,११५ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाला आहे.
शुक्रवारचे सोन्याचे दर (IBJA नुसार)
शुद्धता सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट १,२१,५१८ रुपये
२२ कॅरेट १,२१,०३० रुपये
२० कॅरेट १,११,३१० रुपये
१८ कॅरेट ९१,१४० रुपये
(टीप: हे दर देशभरात समान असले तरी, ज्वेलरी खरेदी करताना तुम्हाला ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस (घडणावळ) वेगळे द्यावे लागतात.)
घसरणीमागे काय आहेत कारणे?
नफावसुली : सोने आपल्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातूतून मोठ्या प्रमाणावर नफावसुली केली. याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि किंमतीवर झाला.
अमेरिका-चीन तणावात घट: अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ तणाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. भू-राजकीय तणाव कमी झाल्यास ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून सोन्याची मागणी घटते, ज्यामुळे किमतींवर ब्रेक लागतो.
दिवाळी, धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण एक सुवर्णसंधी ठरली आहे.