DA वाढीपूर्वी कर्मचाऱ्यांना धक्का! सरकारने घेतला मोठा निर्णय

DA वाढीपूर्वी कर्मचाऱ्यांना धक्का, सरकारने घेतला मोठा निर्णय, केंद्र सरकारने सर्व सरकारी विभागात बायोमेट्रीक हजेरी कर्मचारी लावतात का यावर नजर ठेवण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने सध्याच्या नियमांतर्गतही अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.

Table of Contents

कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी, पगारसह महागाई भत्त्यात वाढ

जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महागाई भत्त्याबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. मार्चमध्ये झालेल्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्के झाला आहे.

Phone पे मधून मिळवा 5 लाख रुपये कर्ज, सोप्या पद्धतीने करा अर्ज

सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर डीएबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सूचना आली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहोचल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. जे कर्मचारी वारंवार उशिरा येतात किंवा लवकर निघतात, त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.

DA वाढीपूर्वी कर्मचाऱ्यांना धक्का! सरकारने घेतला मोठा निर्णय

लाइव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जिओ-टॅगिंग सुविधा

आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली (AEBAS) मध्ये कर्मचारी त्यांच्या उपस्थितीची नोंद करत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. काही कर्मचारी दररोज उशिरा कार्यालयात येत असल्याचेही आढळले. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

DA वाढीपूर्वी कर्मचाऱ्यांना धक्का! सरकारने घेतला मोठा निर्णय

या आदेशात, कार्मिक मंत्रालयाने मोबाइल फोनवर आधारित फेस ऑथेंटिकेशन प्रणाली वापरण्याचा सल्ला दिला आहे, जी उपस्थितीची नोंद करण्यासोबतच ‘लाइव्ह लोकेशन डिटेक्शन आणि जिओ-टॅगिंग’ सारख्या सुविधा देते. आदेशानुसार, AEBAS च्या काटेकोर अंमलबजावणीचा नुकताच आढावा घेण्यात आला आहे.

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई

कर्मचारी वारंवार उशिरा येणे आणि लवकर जाणे याकडे गंभीरतेने पाहावे आणि हे थांबवावे, असे आदेशात म्हटले आहे. असे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सर्व सरकारी विभागांना सांगितले आहे की, कर्मचार्‍यांनी कोणतीही चूक न करता केवळ आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली (AEBAS) वापरूनच त्यांची उपस्थिती नोंदवावी.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाईल

आदेशात असे नमूद केले आहे की, AEBAS प्रणालीमुळे ‘नोंदणी केलेले’ कर्मचारी आणि ‘प्रत्यक्षात कार्यरत’ कर्मचारी यांच्यात कोणताही फरक राहणार नाही. सर्व विभाग प्रमुखांना (HODs) त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या वेळा आणि उशिरा येणे यासंबंधीच्या नियमांबद्दल जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागप्रमुख नियमितपणे सरकारी वेबसाइट www.attendance.gov.in वरुन अटेंडन्स रिपोर्ट डाउनलोड करतील आणि वारंवार उशिरा येणाऱ्या किंवा लवकर निघणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवतील, असेही आदेशात म्हटले आहे.

DA वाढीपूर्वी कर्मचाऱ्यांना धक्का! सरकारने घेतला मोठा निर्णय

शासकिय नियमानुसार, एक दिवस उशिरा आल्यास अर्ध्या दिवसाची कॅज्युअल लीव्ह (किरकोळ रजा) कट केली जाईल. महिन्यात दोनदा वैध कारणास्तव उशिरा आलात, तर जास्तीत जास्त एक तासाचा विलंब माफ केला जाऊ शकतो, याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात. किरकोळ रजा कापण्यासोबतच वारंवार उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

Leave a Comment