IPL 2025 : गुजरात टायटन्समध्ये, फिलिप्सच्या जागी घातक अष्टपैलू खेळाडूला मिळाली एंट्री

IPL 2025 Gujrat Titans Team : गुजरात टायटन्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. संघातील दमदार खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाकाला संधी देण्यात आली आहे.

ग्लेन फिलिप्स ला दुखापत IPL 2025 Gujrat Titans Team

फिलिप्सला 6 एप्रिल रोजी राजीव गांधी स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दुखापत झाली. ते सामन्यात गुजरातसाठी फील्डिंग करत असताना जखमी झाले. या मोसमात ते एकही सामना खेळू शकले नव्हते. फक्त हैदराबादविरुद्ध ते सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरले होते, पण पाचव्या षटकात दुखापत झाल्यानंतर ते मैदानाबाहेर गेले.

शनाकाला मिळणारी सैलरी

गुजरात टायटन्सने शनाकाला फिलिप्सच्या जागी संघात सामील करून घेतले आहे. त्याला या मोसमासाठी 75 लाख रुपये सैलरी दिली जाणार आहे. शनाका यापूर्वी फक्त आयपीएल 2023 मध्ये गुजरातसाठी खेळला होता आणि त्याने 3 सामने खेळले होते.

शनाकाचा क्रिकेट कारकीर्दीतील प्रवास

दासुन शनाकाचा टी20 क्रिकेटमधील अनुभव मोठा आहे. त्याने आतापर्यंत 243 टी20 सामने खेळले असून त्यात 4449 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 16 अर्धशतके समाविष्ट आहेत. गोलंदाजी करताना त्याने 91 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शनाकाने 102 सामने खेळले असून त्यात 1456 धावा व 33 बळी घेतले आहेत. तसेच, वनडे सामन्यांमध्ये त्याने 71 सामने खेळले असून त्यात 1299 धावा आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a Comment