Kangana Ranaut slapped by CISF Lady Jawan : हिमाचलच्या मंडीतील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला रक्षकाने थप्पड मारली आहे.
हिमाचलच्या मंडी संसदीय मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रनौत आज दिल्लीला जात होत्या. चंडीगड एअरपोर्टवर त्यांना सीआयएसएफच्या एका महिला जवानाने थप्पड मारली. यामुळे एअरपोर्टवर गोंधळ झाला. कंगनावर हल्ला करणाऱ्या महिला जवानाचे नाव कुलविंदर कौर आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
थप्पड मारण्याचे हे कारण होते
थप्पड मारण्याचे कारण शेतकरी आंदोलनाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी कुलविंदर कौरने थप्पड मारण्याचे कारण सांगताना एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तिने (कंगना) म्हणाली की प्रत्येक शेतकर्याने शेतकरी आंदोलनाला बसण्यासाठी 100 रुपये धरणे घेतले असे वक्तव्य केले होते. त्यावेळेस त्या आंदोलनात सबंधित CISF महिला कर्मचारी ची आई होती.
कंगनाने अनेक वक्तव्ये केली होती
शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना राणौतने अनेक वक्तव्ये केली होती. सोशल मीडियावरही त्यांनी आंदोलकांची तुलना खलिस्तानीशी केली होती. खलिस्तानी दहशतवादी आज सरकारवर दबाव आणत आहेत, पण आपण एका महिलेला विसरता कामा नये, असे त्यांनी लिहिले होते. इंदिरा गांधींनी त्यांना आपल्या बुटाखाली चिरडले होते. असे वक्तव्य केले होते म्हणून तो राग मनात धरून सबंधित CISF महीला कर्मचारी ने रोष व्यक्त केला.