Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेसाठी बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहिन्याला 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये मिळतील.

या योजनेसाठी अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन आपल्याला अर्ज करावी लागतील.
या योजनेसाठी 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. बँक खाते नसल्यास अर्ज करता येणार नाही.

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही. कोणालाही अर्ज करता येईल. फक्त शिक्षणाची अट आहे. अर्ज पूर्ण भरावा लागेल.
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताना आपले नाव, पत्ता आणि वय नमूद करावे लागेल. माहिती काळजीपूर्वक भरावी, अर्ज वाचून तपासावा, आणि नंतर सबमिट करावा. बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी असून अर्ज प्रक्रिया सोपी आहे.
अर्ज कसा करावा या करिता पुढील व्हिडिओ पहा