Ladki bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – रक्कम जमा झाली का? जाणून घ्या झटपट!
महिला दिनाच्या (८ मार्च) निमित्ताने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित ३००० रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सुमारे 2.52 कोटी पात्र महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला असून, फेब्रुवारीचा १५०० व मार्चचा १५०० रुपये असा हप्ता एकत्र देण्यात आला आहे.
रक्कम जमा झाली का हे कसे तपासावे?
SMS द्वारे खात्री करा: जर रक्कम जमा झाली असेल तर बँकेकडून SMS येईल.
मिस्ड कॉलने बँक बॅलन्स तपासा: खालील तक्त्यात तुमच्या बँकेचा मिस्ड कॉल नंबर वापरा.
ATM वरून तपासणी: डेबिट कार्ड वापरून तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली का हे पाहू शकता.
नेट बँकिंग/मोबाईल अॅप्स वापरा: Google Pay, PhonePe, बँकेचे अॅप्स वापरून बॅलन्स तपासा.
बँकेत प्रत्यक्ष भेट द्या: खात्याची माहिती मिळवा.
DBT लिंक स्टेटस: आधार आणि बँक खाते लिंक आहे का हे माय आधार वेबसाइटवरून तपासा.
DBT लिंक स्टेटस कसे तपासावे?
टप्पा
माहिती
1
माय आधार वेबसाइटवर जा
2
आधार क्रमांक टाका व OTP व्हेरिफाय करा
3
डॅशबोर्डवर “बँक सीडिंग स्टेटस” वर क्लिक करा
4
खाते लिंक स्थिती “Active” असेल तर DBT लिंक आहे
मिस्ड कॉलद्वारे बँक बॅलन्स तपासणी – तक्ता
बँकेचे नाव
मिस्ड कॉल नंबर
तपशील
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
09223766666
SMS द्वारे शिल्लक तपशील
पंजाब नॅशनल बँक (PNB)
18001802223
टोल-फ्री; SMS द्वारे तपशील
बँक ऑफ बडोदा (BOB)
09223011311
SMS द्वारे तपशील
HDFC बँक
18002703333
SMS द्वारे तपशील
ICICI बँक
9594612612
SMS द्वारे तपशील
ऍक्सिस बँक
18004195959
SMS द्वारे तपशील
इंडियन बँक
09289592895
SMS द्वारे तपशील
केनरा बँक
09015483483
SMS द्वारे तपशील
युनियन बँक ऑफ इंडिया
09223008586
SMS द्वारे तपशील
बँक ऑफ इंडिया (BOI)
09015135135
SMS द्वारे तपशील
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)
8424046556
SMS द्वारे तपशील
प्रश्न
उत्तर
पैसे मिळाले का हे कसे तपासावे?
नारी शक्ती दूत अॅप, अधिकृत वेबसाइट किंवा ग्रामपंचायत/सेतू केंद्रात चौकशी करा
पैसे कधी जमा होतात?
दर महिन्याच्या २४ तारखेला. विशेष प्रसंगी वेगळ्या दिवशी सुद्धा जमा होऊ शकतात (जसे ८ मार्च २०२५ ला फेब्रुवारी-मार्चचे हप्ते)
पात्रता काय आहे?
महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिला, कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी, आणि आयकर न भरलेले असावे