Ladki bahin scheme latest news : लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून, राज्यातील महिलांना प्रतिमाह ₹1500 मानधन दिले जाते. राज्यातील महिलांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, ही योजना ‘सुपरहिट’ ठरली आहे. सुमारे 21 ते 65 वयोगटातील 2.5 कोटी महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
अपात्र लाभार्थ्यांची तपासणी
राज्य शासनाने योजनेसाठी काही ठराविक निकष निश्चित केले होते. मात्र, काही महिलांनी या निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे, आणि लाखो महिला यामध्ये अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 7,19,880 महिलांनी अर्ज केला होता. त्यातील 6,00,563 महिला पात्र ठरल्या. परंतु आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केल्यावर अनेक श्रीमंत महिलांचे आर्थिक व्यवहार उघडकीस आले, ज्यामध्ये 27,313 महिलांना अपात्र ठरवले गेले. यामध्ये शेती, चारचाकी, घर, दुकान किंवा सरकारी नोकरी असलेल्या महिलांचा समावेश आहे.
मानधन कपात – फक्त ₹500 मिळणार
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दरमहा ₹1000 लाभ मिळतो, अशा 7,74,148 महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून ₹1500 ऐवजी फक्त ₹500 मानधन दिले जाणार आहे. शासन निर्णयानुसार, उर्वरित फरकाचे ₹500 त्यांना सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. हा हप्ता अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता किती असेल?
एप्रिल महिन्याचा हप्ता ₹1500 रुपये असणार आहे, परंतु नमो शेतकरी लाभार्थी महिलांना ₹500 रुपयेच वितरित केले जातील.
अधिकृत वेबसाइट
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट:
https://ladakibahin.maharashtra.gov.in