मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3.0 नोंदणी – सविस्तर माहिती (2025)
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजना नोंदणी कालावधी
- पहिला टप्पा: 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024
- दुसरा टप्पा: कालावधी वाढवून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत
या कालावधीत सुमारे 3 कोटी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दाखल झाले. यापैकी पात्र ठरलेल्या 2.46 लाख महिलांना डिसेंबरपर्यंतच्या हप्त्याचे पैसे सरकारने वितरित केले.
महिला वंचित का राहिल्या?
- काही अर्ज तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाले.
- काहींना योजनेबाबत योग्य माहिती मिळाली नाही.
आनंदाची बातमी (2025)
सरकारने आता या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी (लाडकी बहीण योजना 3.0) नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. 11 जानेवारी 2025 पासून योजनेची अधिकृत वेबसाईट पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे.
योजना आढावा
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरुवात तारीख | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना (लवकरच 2100 रुपये महिना) |
नोंदणी पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
हेल्पलाइन नंबर | 181 |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 3.0 साठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार लिंक असलेले बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- 15 वर्षे जुने अधिवास प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, जन्मदाखला, राशन कार्ड यांपैकी कोणतेही एक कागदपत्र
- हमीपत्र
पात्रता निकष
- अर्जदार महिला महाराष्ट्राची स्थायी रहिवासी असावी.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी.
- कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
- कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.
- कुटुंबातील सदस्य आयकरदाते नसावेत.
नोंदणी कशी कराल? (ऑनलाईन अर्ज प्रक्रिया)
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
- अधिकृत वेबसाईटवर जा.
- “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा.
- खाली दिसणाऱ्या “Create Account?” पर्यायावर क्लिक करून साईन अप फॉर्म भरावा.
- आवश्यक माहिती (आधार, नाव, पत्ता) अचूकपणे भरा.
- साईन अप केल्यानंतर मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- “Application of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” वर क्लिक करा.
- फॉर्ममध्ये आधार क्रमांक टाका व “Validate Aadhar” वर क्लिक करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती तपासून Submit करा.
टीप: सध्या ऑनलाईन प्रक्रिया तात्पुरती बंद असल्याने महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करावा.
महत्त्वाच्या तारखा व अपडेट्स
- अर्ज प्रक्रिया सुरू होणार: लवकरच तिसऱ्या टप्प्यात नोंदणी सुरू होईल.
- सातवा हप्ता: 15 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान लाभार्थींच्या खात्यात जमा होईल.
महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे अधिक माहिती घेऊ शकतात.